पाऊस

पाऊस 



पाऊस, गुढगर्भ, भयकथा, Gudhgarbh, Paus, Marathi, poems, Stories, blogspot, designs, love stories, horror stories, in marathi,


पाऊस म्हणजे चिखलपाणी 

पाऊस म्हणजे बेडूकगाणी 

पाऊस म्हणजे अंगणातली 

चिंब भिजली रातराणी  ll


पाऊस म्हणजे गोडगप्पा 

हळव्या आठवणींचा कप्पा 

शाळेमध्ये हुंदडणाऱ्या 

अवखळ बालपणीचा टप्पा  ll


पाऊस म्हणजे चिकचिक पिरपिर 

पाऊस म्हणजे हिरवे वैभव 

पाऊस म्हणजे निसर्गातल्या 

सुप्त ऋतूंचे हिरवे शैशव  ll


पाऊस म्हणजे भिरभिर वारा 

पाऊस म्हणजे मोरपिसारा 

पाऊस हसऱ्या श्रावणातल्या 

इंद्रधनूचा गगनझुला  ll



गूढगर्भ - स्वरचित 


हे सुद्धा वाचा.. 

कथा : अ मिडसमर ड्रीम - भाग १

No comments:

Post a Comment