आकाशीच्या वेलीवर

आकाशीच्या वेलीवर उमलल्या तारका

चंद्रबिंब होऊनी आले तयांचा लाडका....


पौर्णिमेच्या सांजवेळी नभी दाटे वारा कुंद

दर्याच्या लाटांवरती तो वाहता धुंद सुगंध

किनाऱ्याच्या साथीविना सागर होई पोरका....


वात्सल्य साऊल्यांचे क्षितिजावर निमाले

माडांत नारळीच्या चौफेर भार ओले

हळुवार शिंपल्यांचा गंध हा वाळका....



gudhgarbh , goodhgarbh , kavita , aakashichya velivar , swarachit , svarachit , https://gudhgarbh.blogspot.com/2020/10/blog-post_17.html , गूढगर्भ , कविता , आकाशीच्या वेलीवर



(गूढगर्भ - कवितासंग्रह)

No comments:

Post a Comment