अ मिडसमर ड्रीम - भाग ७

 

त्या दोघी धावत डार्क हाऊसच्या बाहेर पळाल्या. स्टेलाने मागे वळून पाहिले. तिथे डार्क हाऊसची पुसटशी खूणही नव्हती. आता त्या दोघीच एकमेकींना धीर देणार होत्या. या सैतानी सापळ्यातून कसं बाहेर पडायचं याचा विचार करायचं एव्हाना त्यांनी सोडून दिलं होतं. त्यापेक्षा सर्व खेळ खेळून रीतसर नियम पाळून बाहेर पडू असं त्यांनी ठरवलं. केटचा धीर खचला होता. आता इथून सुटका नाही अशी तिची खात्री झाली होती. तिचं स्टेलाकडेही लक्ष नव्हतं. भिरभिरत्या डोळ्यांनी ती सर्व खेळण्यांकडे पहात होती. ती खेळणी नेहमीच्या खेळण्यांप्रमाणेच भासत होती. आता पुस्तकाची फक्त चार सहा पानेच वाचायची राहिली होती. स्टेलाने जास्त वेळ न दवडता पुढचा नियम वाचला -

'डोन्ट ट्रस्ट ऑन ड्रीम्स ऑर गो टू हेल.'

या नियमाखाली आणखी एक ओळ लिहिली होती -

'ट्रस्ट यॉरसेल्फ.... इफ यू आर या प्योर सोल यू विल शुअरली फाऊंड द एंड ऑफ धिस गेम.'

ही ओळ वाचल्याच्या दुसऱ्याच क्षणी केट व स्टेलाच्या आजूबाजूचं वातावरण बदललं. जत्रेतली खेळणी नाहीशी झाली होती. सर्वत्र काळोख भरून राहिला होता.

थोड्याच स्टेलाला जाणवलं की तिच्या आसपास कबरी गाडलेल्या आहेत. एकेक करून त्या कबरींमंधील मृतदेह बाहेर येऊ लागले. काही सुस्थितीत होते तर काहींच्या शरीराची लक्तरं झाली होती. स्टेलाने केटकडे पहिले तर केट गर्भगळीत होऊन हातातल्या शस्त्राने स्वतःवरच वार करण्याच्या बेतात होती. प्रसंगावधान राखून स्टेलाने तिला भानावर आणले. त्या दोघींनी तिथून पळण्याचा व्यर्थ प्रयत्न केला पण त्यांचे पाय त्या मातीत इतके घट्ट रुतले होते की त्यांना तसूभरही हलता येत नव्हते. त्यांच्यापासून वीसेक पावलांवर गोलाकार पायऱ्या बनल्या. त्यांच्या उंच गेलेल्या टोकावरून जत्रेतली सैतानी खेळणी जखमी अवस्थेत खाली येऊ लागली. त्या प्रत्येकाच्या शरीरावर एकतरी भळभळती जखम होती. त्यात तो मघाचा गुबगुबीत गुलाबी रंगाचा टेडी देखील होता. जो आता रक्ताने पूर्णपणे न्हाऊन निघाला होता. ते भयानक दृश्य पाहून स्टेलाच्या तोंडून सहज उद्गार निघाले, "ओ जीजस, सेव्ह मी...."


gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , a midsummer dream , part 7 , गूढगर्भ ,गूढकथा , अ मिडसमर ड्रीम , भाग ७ , https://gudhgarbh.blogspot.com/2021/01/blog-post_19.html


स्टेलाने देवाचा धावा सुरु केला. तिला प्रकर्षाने आईवडिलांची आठवण येऊ लागली. हळूहळू तिच्या डोळ्यापुढील दृश्य धूसर होत गेले. तिच्या डोळ्यासमोर आता तिचे आईवडील होते. जे काही वर्षांपूर्वी वारले होते. ते प्रकाशमान होते. त्यांचे कपडे स्वच्छ होते. आता स्टेलाला आजूबाजूला कबरी दिसत नव्हत्या, ते मृतदेह दिसत नव्हते की ती रक्तमाखली खेळणी दिसत नव्हती. आपल्या आईवडिलांना समोर पाहून स्टेलाला खूप आनंद झाला. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. केटला मात्र अगोदरचंच भयानक दृश्य नजरेसमोर दिसत होतं. पाहता पाहता ते मृतदेह तिच्या अगदी जवळ आले आणि तिने पुढचा मागचा विचार न करता झटकन डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतरही तिच्यामध्ये किंवा भोवतालच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता. त्या पिशाच्चांनी तिच्यावर हल्ला केला. त्यांनी जिवंतपणीच तिच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केली. केट भयंकर वेदनांनी विव्हळू लागली. स्टेला आणि केट मरणाच्या दारात होत्या. त्यांना फ्रॅंक आणि जेम्स सुद्धा दिसले. दोघेही जखमी अवस्थेत होते आणि त्या दोघींकडे मदत मागत होते. पण हा निव्वळ आभास आहे याची स्टेलाला पुरेपूर कल्पना होती. स्टेलाने त्यांना मदत केली नाही आणि केटलाही तसे करण्यापासून परावृत्त केलं. स्टेला कह्यात येत नाही हे पाहून त्या दोघांनी आपले खरं रूप दाखवलं. जेम्स आणि फ्रॅंक जत्रेतल्या सैतानांमुळे मृत पावल्याने ते सुद्धा आता त्यांच्यासारखेच झाले होते. स्टेला तिच्या आईवडिलांकडे पाहून आसवं गाळीत होती. तिच्या आईवडिलांचे चेहरे मात्र प्रसन्न दिसत होते. ते तिच्याकडे पाहून स्मित करत होते. अचानक तिच्या कानांवर केटचा विचित्र आवाज पडला. इतका वेळ केटकडे तिने लक्ष दिलं नव्हतं. तिला सैतानांनी चहूबाजूंनी घेरलं होतं. ती जखमी होती. वेदनेने विव्हळत होती. तिने धीर सोडला आणि ती सैतानाच्या अधीन झाली. एकदम प्रकाशाचा झोत पडावा तसा उजेड पडला आणि केटला सोबत घेऊनच लुप्त झाला. स्टेलाच्या कानात डोअरकिपरचा परिचित घोगरा आवाज घुमला, "काँग्रॅट्स.... यू वोन."

स्टेला तिच्या जाणिवेत परत आली होती. आता ती केटच्या गाडीत होती. स्टेलाला झोप लागली होती आणि ती गाडीतच मान मागे टाकून झोपली होती. तिने हलकेच डोळे उघडले. गाडीत स्टेलासह केट व तिचे दोन मित्र जेम्स आणि फ्रॅंक देखील होते. ते तिघेही मजामस्ती करत होते. स्टेलाच्या मांडीवर तिने वाचून संपवलेले पुस्तक होते. अचानक त्या तिघांचं स्टेलाकडे लक्ष गेलं. ते तिलाही आपल्या खेळामध्ये सामील करू पाहत होते आणि स्टेला मात्र त्यांच्याकडे बावरून बघत राहिली होती. स्टेलाने आपल्या मांडीवरचं पुस्तक उचललं. त्या पुस्तकाच्या खाली आणखी एक पुस्तक होते. ज्याच्या मुखपृष्ठावर तिच्यासारखेच कपडे घातलेल्या मुलीचं चित्र होतं. ती मुलगी एका जत्रेत जखमी खेळण्यांमध्ये उभी होती आणि आजूबाजूला रक्ताचा सडा पडला होता. त्या पुस्तकावर नाव होतं…. 'अ मिडसमर ड्रीम.'

स्टेला पुस्तक पाहण्यात मश्गुल असताना एकाएकी गाडी थांबवून बाकीचे तिघे गाडीतून उतरले. पुस्तक बाजूला ठेऊन ती धडपडत त्यांना पहायला त्यांच्या मागे गेली. तोच सर्व एका सुरत ओरडले, "सरप्राईज...." स्टेला धावतच त्यांच्याजवळ पोचली. दोन पावलं मागे सरकून तिने ते उभे असलेली जागा निरखून पहिली. ते सर्व त्याच जत्रेच्या मोठ्या गेटपाशी उभे होते होते जी स्टेलाने स्वप्नात पाहिली होती. क्षणात स्टेलाला सर्व घटनांची वर्गवारी लागली. क्षणभर तिला भोवळ आल्यासारखं झालं. त्या ग्लानीतून भानावर येत ती डोकं गच्च पकडून ओरडली.... "नो...ऽऽऽऽऽऽ."


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* स्ट्रेचरवरचा माणूस 

* दत्तकृपा 


No comments:

Post a Comment