लेखिकेविषयी....

          
            नमस्कार, मी सौ. अश्विनी अमित चव्हाण. एक  मध्यमवर्गीय गृहिणी. आतापर्यंत मी चित्रं काढली, कविता केल्या, इतरांच्या कथा वाचल्या, पण हा कथा लिखाणाचा प्रयत्न पहिलाच. एका पुस्तकबांधणीच्या प्रक्रियेमध्ये नवोदित लेखकांची जमवाजमव करताना मला एक कथा सुचली. तिचं कौतुक झालं. मग हुरूप वाढला. आणखी कथा सुचल्या. माझी चित्रं, माझं साहित्य लोकांपर्यंत पोहोचावं असं वाटलं आणि मी ब्लॉग सुरु केला.

             मला गूढकथा वाचायला आवडतात. ही गोडी निर्माण करणाऱ्या (स्वर्गीय) रत्नाकर मतकरींच्या गूढकथांची मी चाहती आहे. माझ्या मते भीती म्हणजे वरवर साध्या दिसणाऱ्या गोष्टीत दडलेलं भयंकर गुपित. अगदी डोळ्यांदेखत घडलेल्या घटनेतही कधीकधी अतर्क्य शक्यता आढळतात. मग ते गुपित अंगावर येणारच असावं असं काही नाही. भीती म्हणजे केवळ वातावरणनिर्मिती नव्हे. अवचित एखादी घटना घडावी आणि त्याची गूढ वलयं उमटत जावी तसंच काहीसं आहे हे. माझ्या कथाही अशाच आहेत. भीतीच्या थंड शिरशिरीची अनुभूती देणाऱ्या.

No comments:

Post a Comment