रिटर्न गिफ्ट - भाग १

        चाळीत नव्यानेच राहायला आला होता तो. सदरा, लेंगा, डोळ्याला जाड फ्रेमचा चष्मा, खांद्याला शबनम बॅग. कोणाच्याही अध्यात न मध्यात असं एकंदर व्यक्तिमत्व होत त्याचं. जेमतेम पोटापुरतं भागेल एवढी मिळकत होती. जास्तीची अपेक्षाच नव्हती. लग्न बिग्न तर दूरची बात. कोणी पाहुणा रावळा आला तरी विचार करूनच जेवायला थांबायचा त्याच्याकडे. तो रहात असलेल्या चाळीचं भाडं कमी होतं तरीही ती अर्धी चाळ रिकामीच होती. त्याचं कारण सर्वांना माहित असूनही लोक सहजासहजी सांगत नसत. एक मजली चाळ. दोन्ही बाजूला आठ-आठ खोल्या. तळातल्या खोलीत भाडेकरूची दोन बिऱ्हाडं. वरच्या खोलीत दोन बिऱ्हाडं. बाकी चाळ रिकामीच. जेमतेम दहा बाय दहा ची खोली. आल्या दिवसापासून जरा दबकूनच होता तो. तशी वदंताच होती चाळीची.  तिथे कुणाच्याच चप्पल जागेवर राहत नाहीत म्हणे. हे पण काय कारण आहे वदंतेचं? हो पण या चाळीसाठी आहे. दोनमजली चाळ प्रत्येक मजल्यावर समोरासमोरच्या धरून सोळा खोल्या. एवढ्या क्षुल्लक कारणासाठी लोक घाबरतात म्हणजे कमाल आहे. संध्याकाळी तो विचारांच्या तंद्रीतच खोलीत शिरला. तो चहाची तयारी करतच होता की दारात चाळीचे मालक येऊन ठेपले.   

"कुणी आहे का घरात?"

"अरे या या....  ऍडव्हान्स काढूनच ठेवलेत. बरं झालं तुम्ही आलात. आता पैशांची फॉरमॅलिटी झाली म्हणजे मी मोकळा.


gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , return gift , part 1 , गूढगर्भ , गूढकथा , रिटर्न गिफ्ट , भाग १


"तुमचं काही सा…मा...न दिसत नाही." मालक शोधक नजरेने म्हणाले. 

"छे छे, माझ्यासारख्या सडाफटिंग माणसाला कसलं आलंय सामान आणि कशाला लागतंय इतकं. तसाही असतोच कुठे मी घरी. म्हणजे आम्ही पत्रकार मंडळी सतत फिरतीवर. रात्री पथारी टाकण्यापुरता आसरा हवाय बस्स." 

"ते झालंच हो, पण मी चाललोय जरा बाहेरगावी. माझ्या चुलत मेव्हण्याची तब्येत बरी नाही. त्यासाठी म्हणून जरा चार दिवस सासुरवाडीला जाणं आहे. तुम्ही आता एकटे पडाल. नाही म्हणजे या मजल्यावरच्या दोन खोल्या भाड्याने दिल्यात. बाकीच्या बंद आहेत आणि ज्या भाड्याने दिल्यात त्यांची मुदत उद्या संपणार आहे."

"बरं मग?"

"नाही, तसं काही नाही. तुम्ही जरा रात्री लवकरच या खोलीवर. रात्रीचे दिवे नसतील ना इथे म्हणून म्हटलं. शिवाय रात्री कसले आवाज आले तर लक्ष देऊ नका. इथे बांधकामावर असलेल्या मजुरांची पोरं येतात खेळायला. त्यांना कसला दिवस नि कसली रात्र. तर लक्ष द्यायचं नाही. अगदी काहीही झालं तरी."


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


वारसा 

* अनाहूत

No comments:

Post a Comment