अ मिडसमर ड्रीम - भाग ६

 

तिघेही तिथून पळून कसेबसे एका उंच राजवाड्यासारख्या दिसणाऱ्या मनोऱ्याजवळ आले. तो एक कापडाचा मनोरा होता. आत जायला लहानसे प्रवेशद्वार होते. पण आत जायची वाट अंधारी होती. स्टेलाने पुस्तकातला पुढला नियम वाचला. त्या नियमाखाली दोन पर्याय दिले होते -

'एंटर इन द डार्क पॅलेस ऑर कट युअर फ्रेंड्स बोथ हॅंड्स'

दोन्हीपैकी पहिला पर्याय निवडणं सर्वांना सोयीचं होतं. आता डार्क पॅलेस शोधणं गरजेचं होतं.तिघेही इथेतिथे पॅलेसचं नाव शोधू लागले. इतक्यात केटला तो पॅलेस सापडला. इतका वेळ ते ज्या कापडी मनोऱ्यासमोर उभे होते तेच डार्क पॅलेस होते. त्या मनोऱ्यावर डार्क पॅलेसच्या नावाचा बोर्ड काळ्या अक्षरात लिहिलेला होता. बाहेरून सरळ नि अरुंद वाटणारा पॅलेस आत प्रशस्त होता. मनोऱ्याला मधोमध वक्राकार पायऱ्या होत्या. बाहेरच्या जागेपेक्षा इथे जास्त अंधार होता. एखाद दुसऱ्या मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश पडला होता. आता पुस्तकातल्या पुढल्या नियमाचं वाचन करायचं या विचारात असतानाच फ्रँकचा पाय जमिनीवरच्या लाकडी फटीत अडकला. त्याच्या पायाला काहीतरी गुंडाळलं जात असल्याची त्याला जाणीव झाली. ते जे काही होतं ते सरपटणारं होतं. सापासारखं लिबलिबीत होतं. महत्प्रयासाने त्याने त्या गुंडाळीतून पाय सोडवला. पहिल्या खेळाच्या वेळी घेतलेली हत्यारं एकट्या केटकडे होती. तिघे अंधारात वाट काढत पुढे जात होते. तळातल्या रूम मध्ये काहीच नव्हते. फ्रॅंकने लायटरच्या उजेडात पुस्तकात पहिले. त्यावर वक्राकार पायऱ्या चढण्याचा संकेत दिला होता. तिघे पायऱ्या चढून वर गेले. खोलीच्या सर्व कोपऱ्यात मंद दिवे लावले होते. चोहोबाजूलाआरसे लावलेले होते. मोठमोठाले आरसे. पण त्यात दिसणारी प्रतिमा मात्र एकसारखी नव्हती. प्रत्येक आरशात वेगवेगळ्या विचित्र स्वरूपातली प्रतिमा दिसत होती. एका आरशात माणूस पूर्ण सडलेल्या शरीराचा अक्षरशः झॉम्बी दिसत होता, दुसऱ्या शरीरात त्याला मुंडके नव्हते, एका आरशात शरीर धडधाकट दिसे पण शरीराच्या सर्व अवयवांची जागा बदललेली दिसे. सर्व आरसे अशा भयानक प्रतिमांनी भरलेले होते. हळूहळू त्या प्रतिमा पुढे पुढे सरकू लागल्या. जसं काही त्यांना आरशाच्या बाहेर यायचं होतं.


Goodhgarbh , Gudhgarbh , Gudhkatha , a midsummer dream , part 6 , गूढगर्भ , गूढकथा , अ मिडसमर ड्रीम , भाग ६ , https://gudhgarbh.blogspot.com/2021/01/blog-post_14.html


फ्रॅंकला आधीच जखम झाली होती. त्या जखमेतून रक्त वाहत होते. रक्ताला चटावलेल्या पिशाच्चांना फ्रॅंकचा घास घ्यायचा होता. केट आणि स्टेला दोघी अजूनही खालच्या मजल्यावरच होत्या. फ्रँकचा आवाज येत नाही हे पाहून त्या दोघी पायऱ्या चढून वर गेल्या. त्यांना समोर दिसलेलं दृश्य भयानक होतं. फ्रॅंक आरशातल्या ज्या प्रतिमेकडे पाहत उभा होता त्या प्रतिमेसारखाच होत होता. लवकरच तो पूर्णपणे सैतान बनणार होता. त्याची कातडी झडत चालली होती, डोळे पिवळसर पांढरे होत होते, केस झडत होते आणि अंगावर लव वाढत होती. फ्रॅंकने हळूच हसत त्याची मान केटकडे वळवली. त्यावेळी तिला त्याचे तीक्ष्ण दातही दिसले. फ्रॅंक आता नॉर्मल राहिलेला नाही ते त्या दोघींना पुरते उमजले. हातातल्या नेमबाजीच्या बंदुकीचा नेम धरून तिने त्याच्यावर गोळी झाडली. फ्रॅंक मरण पावला. आश्चर्य म्हणजे गोळी लागून मृत पावलेला फ्रॅंक पूर्वीसारखाच मानवी रूपात होता. परंतु आता वेळ निघून गेलेली होती.



(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* रघ्याची बायको 

* रिटर्न गिफ्ट 

No comments:

Post a Comment