अनाहूत - भाग ५

"गुड मॉर्निंग इन्स्पेक्टर, तुम्ही इतक्या लवकर याल असं वाटलं नव्हतं. बरं, चहा घेणार?"

"हो, चालेल की. आता निघालो तर वेळेत पोहचू म्हणून लवकर आलो. शिवाय पोहोचेपर्यंत दुपार सहज होईल पर्यटकांची दाटी नसेल आणि तपास नीट करता येईल."

"हरकत नाही. चहा घ्या." डॉक्टरांनी वाफाळत्या चहाचा कप तावडेंसमोर ठेवला. चौकीत राहिलेली चहाची तल्लफ तावडेंनी लॅबमध्ये भागवली.

"चौकीत जाऊन आलो. केसच्या फाईल्स नजरेखालून घातल्या. माझ्या असिस्टंट हवालदाराने चहा देखील आणून ठेवलेला. तेवढ्यात कमिशनर साहेबांचा कॉल आला. काय म्हणावं या माणसाला. चार केसेसपैकी ही लास्ट केस माझ्याकडे आली. बाकीच्या तीन केसेस सॉल्व्ह झाल्या नाहीत त्याचं काहीच नाही पण उलट मलाच म्हणतो किती वर्ष आहात डिपार्टमेंटमध्ये म्हणून. केस हातात आल्यापासून मी फिरतीवरच आहे. तुमच्या लॅबमधून हिंजवणीला आणि हिंजवणी मधून चौकीवर. माकडउड्या चालल्यात नुसत्या. बोलायला काय जातंय कोणाला. सबळ पुरावे मिळाल्याखेरीज कोणाला पकडायचं?" तावडेंचा राग उफाळून बाहेर पडत होता.

 

गूढगर्भ , अनाहूत , भाग ५ , https://gudhgarbh.blogspot.com/2020/09/blog-post_8.html , gudhgarbh , goodhgarbh , anahut , part 5


डॉ. एन. चंद्रा आणि इन्स्पेक्टर तावडे हिंजवणी घाटाकडे जायला निघाले. घाट चढायच्या अगोदर त्यांनी काही स्थानिक लोकांकडे चौकशी केली. फारच थोड्या लोकांना याबाबत माहिती होती. सुट्ट्यांचे दिवस असल्याने हिल स्टेशन म्हणून पर्यटकांची गर्दी उसळली होती. पोटापाण्याचा धंदा सोडून कोणी नसत्या भानगडीत पडायला तयार नव्हते.  

तावडे जिद्दीला पेटले होते. प्रसंगी पोलिसी खाक्या दाखवायला लागला तरी चालेल पण आज खबर काढायचीच असं काहीसं मनाशी ठरवून ते आले होते. चौकशी करता करता ते एका हॉटेल वर आले. हॉटेल तसं यथातथाच होतं पण मोकळं होतं. मालक नवखा होता. तावडेंनी घाटातल्या पठाराबद्दल विचारताच त्यानेही खांदे उडवले.

हॉटेलचा वयस्कर नोकर तिथे काम करत होता. सहजच त्याच्या कानावर पडलं आणि तो नखशिखांत हादरला. तावडे गाडीत बसतच होते की तो नोकर धावतच त्यांच्या मागून आला.

"सायेब, तुमी काय म्हनत व्हता मगाशी मालकाना?"

पुन्हा एकदा तावडेंनी थोडक्यात सर्व केसेस त्याच्यापुढे मांडल्या.

"अवं सायेब, तुमाला वाटतं तेवडं हे प्रकारन सरळ नाय बगा."

"म्हणजे?"

"म्हंजे ती एक येगळीच कथा हाय."

नोकर सांगू लागला. तावडेंनी त्याला हॉटेलमध्ये नेलं. हॉटेल मालकाला तीन चहा आणायचं फर्मान सोडलं आणि पुढे ऐकू लागले. आता डॉक्टरांनाही यात रस वाटू लागला. 


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* अनाहूत - भाग ६

* दत्तकृपा  


2 comments:

  1. This your content are very important knowladge for our news blog website. This is our news blog website list . Can you tell me which hosting are you using for your blog website. for reply and contact us mail on fastnewsfree@gmail.com

    FAST NEWS

    FAST NEWS Health

    FAST NEWS Technology

    FAST NEWS Arts

    FAST NEWS Automobile

    FAST NEWS Sports

    FAST NEWS Food

    FAST NEWS Economics

    FAST NEWS Entertainment

    FAST NEWS Travels

    Thank You,GUDHGARBH !

    ReplyDelete