वारसा - भाग ३

"भाऊजीन्याहारी करताय ना?" वीणा कचरत म्हणाली.

"अं.... हो हो.... द्या ना." विश्वनाथ सावरून म्हणाला. अर्थात, जे घडत होतं त्यात तिची काय चूक होती.

"अगं तू घेतलास का चहा?" सुमती स्वयंपाकघरात आली.

तिने स्वतःला आणि गोदाक्काला चहा ओतला. गोदाक्काला चहा देऊन ती पुन्हा स्वयंपाकघरात आली.

"मी आलोच शेतावर जाऊन." विश्वनाथ चहा संपवून उठला.

"पाहिलंस, यांचं हे असं असतं. काल दिवसभर घरात नव्हते आणि आता परत बाहेर. आता कधी उगवतील परमेश्वराला माहित."

".................."

"तुमच्या घरी कोण कोण असतं?"

"म्हणजे? तुम्हाला यांनी काहीच सांगितलं नाही?"


gudhgarbh , gudhkatha , vaarasaa , part 3 , https://gudhgarbh.blogspot.com/2020/09/blog-post_27.html , गूढगर्भ , गूढकथा , वारसा , भाग ३


"नाही, आमच्या घरची पद्धतच आहे. गोदाक्का आणि भावजींना सोडून घराच्या कोणत्याही गोष्टीत कुणीही लक्ष घालीत नाही. तुला आई नाही एवढंच कळलं मला."

वीणाचा कंठ दाटून आला. डोळे पाणावले.

"आई नाही, बाबा आणि मी दोघेच असायचो. बाबांची आणि ह्यांची ओळखही आमच्या शेतावर झाली. शेतजमीन सोडवायची होती. पैसा नव्हता. मुलगी द्यायच्या अटीवर ह्यांनी जमीन सोडवली. आमच्याकडे खायला अन्न नव्हतं, लग्नात काय देणार. बाबांना माझ्या लग्नाची काळजी होती. ह्यांनी स्वतःहून मागणी घातली. मातब्बर घराणं मिळालं म्हणून बाबा समाधानी होते. पण...." वीणा स्फुंदून स्फुंदून रडू लागली.

"अगं वेडे, रडतेस काय अशी. बाबांची फार आठवण येतेय का? जाऊन ये चार दिवस. आल्या आल्याच कामाला लागलीस. मी तरी काय वेंधळी. तुला चहा सुद्धा नाही विचारला. बैस हं. मी गोदाक्काला विचारून तुझी निघायची व्यवस्था करते."

"त्याचा काही उपयोग नाही"

"म्हणजे?"

"लग्नानंतर मी परतून माहेरी जायचं नाही या अटीवरच ह्यांनी लग्नाला संमती दिली.आता पुन्हा बाबा भेटतील असं वाटत नाही."आणि वीणा पुन्हा अश्रूंमध्ये बुडाली.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* वारसा - भाग २

अनाहूत 

* दत्तकृपा 



2 comments: