अनाहूत - भाग १

रात्रीची वेळ. दाट काळोख. रातकिडयांची किरकिर.अंगाला झोंबणारा गारवा. समोर सुस्त पसरलेला हिंजवणी घाट. घाटाच्या निर्मनुष्य रस्त्यावर एक फियाट वळणं घेत घाटमाथा चढत होती. प्रोफेसर दीक्षित त्यांच्या खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांनी हेरलेल्या जागी जात होते. गाडीच्या मागच्या सीटवर आकाश निरीक्षणासाठी लागणारं सामान ठेवलं होत. त्यांची लाडकी दुर्बीण मात्र डिक्कीत मऊ वेष्टनात बांधून ठेवली होती. गाडीत सौम्य संगीत चालू होते.
"अजून कशी येत नाही ती जागा. नाही म्हणायला एक खूण आहे त्या जागेची. ते वठलेलं झाड. तेच आहे की काय. आलं बहुतेक...."
पठारावरल्या त्या अपेक्षित ठिकाणी येताच दीक्षित गाडीतून उतरले. त्यांनी अगोदर ती जागा नीट पहिली. हेडलाईट बंद केली. गाडीतून सामान आणून सपाट जागी ठेवलं आणि स्टॅन्ड उभा करून दुर्बिणीचा अँगल सेट केला.
"दॅट्स बेटर.... आजची रात्र इथं काढली की उद्याच्या ग्रहणाचा अभ्यास सुरुवातीपासून नीट करता येईल. आता काही तासच उरलेत. तोवर बाकी ग्रहांची स्थिती पाहता येईल."
त्यांनी दुर्बिणीतून आकाश न्याहाळायला सुरुवात केली.

गूढगर्भ , गूढकथा , अनाहूत , भाग १ , https://gudhgarbh.blogspot.com/2020/08/blog-post_22.html , part 1 , gudhgarbh , goodhgarbh , Anahut

"गुड, कधीपासून मागावर होतो याच्या. पण मुंबईला असं स्वच्छ अवकाश मिळेल तर शपथ. हम्म्म, येस. याची नोंद करून ठेवतो."
एका हुलकावणी देत असलेल्या ग्रहाच्या स्थितीची नोंद करून ठेवण्यासाठी म्हणून ते डायरी शोधू लागले.
"अरेच्चा, डायरी गाडीत राहिली. जस्ट अ मिनट...." आपल्या लाडक्या दुर्बिणीला गोंजारून ते पुन्हा गाडीपाशी आले. आतमधून डायरी आणि पेन घेऊन पुन्हा पठार चढू लागले. येताना सहजपणे उचलता येणारे पाय आता कशालातरी चिटकत होते. दुर्बिणीचा स्टॅन्ड सुद्धा कशात तरी रुतल्यासारखा वाटत होता. दीक्षितांचं तिकडे लक्षच नव्हतं. ते आकाशनिरीक्षणात गढून गेले.
"अहं.... व्हॉट्स धिस. आता इथे काय मधे आलं?" अचानक दुर्बिणी समोर काळोख पसरल्याने त्यांची तंद्री भंगली. चिडून त्यांनी आजूबाजूला नजर टाकली.   त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. समोर काहीच दिसत नव्हतं. ते चहुबाजूनी काळ्या भिंतींनी घेरले गेले होते. त्या भिंतींना दारं-खिडक्या नव्हत्या. त्यांनी पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला पण ते उभी असलेली जागा आता दलदल झाली होती. दीक्षित त्यात रुतत चालले होते.
"अरे देवा, काय चाललंय हे. असं कसं अचा.... न.... क.... वाचवा.... वाचवा.... कुणी आहे का इथे.... प्लिज हेल्प मी...."
त्यांना मदत करण्यासाठी घाटमाथ्यावर चिटपाखरूही नव्हते. जवळपास दहा पंधरा मिनिटं दीक्षित आकांत करत होते. हळूहळू ते त्या काळ्या दलदलीत गडप झाले. पठारावर स्मशानशांतता पसरली. दुसऱ्या दिवशी प्रोफेसरांचा देह त्यांच्या खगोलशास्त्रीय सामानासकट पठारावर सापडला. पंचनामा झाला. दोन महिने पोलीस तपास सुरु होता. मात्र सबळ पुराव्यांअभावी केस बंद करण्यात आली.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)

2 comments:

  1. This your content are very important knowladge for our news blog website. This is our news blog website list . Can you tell me which hosting are you using for your blog website. for reply and contact us mail on fastnewsfree@gmail.com

    FAST NEWS

    FAST NEWS Health

    FAST NEWS Technology

    FAST NEWS Arts

    FAST NEWS Automobile

    FAST NEWS Sports

    FAST NEWS Food

    FAST NEWS Economics

    FAST NEWS Entertainment

    FAST NEWS Travels

    Thank You, GUDHGARBH !

    ReplyDelete