वारसा - भाग २

"शंभूनाथाहे अजून आलेले दिसत नाहीत जरा बघून ये बरं."

"बरं वैनीसायेब."

"हल्ली हे रोजचंच झालंय यांचं. जरा म्हणून पाय घरात टिकत नाही. शेतावरल्या त्या खोपटात काय आहे याचा शोध लावायलाच हवा." सुमती तोंडातच पुटपुटली.

विश्वनाथ माळरानावरल्या झोपडीवजा घरात पहुडला होता.

"धाकलं मालक, इथं काय करतासा. घरी वैनीसायब कवाधरना वाट बघत्यात. जेवन खावन काही केलंत की न्हाई? आज घरात लगीन व्हतं, पर काय वाटलंच नाय बगा." दीर्घ उसासा टाकून शंभुनाथ म्हणाला.

"कसं वाटणार, लगीनघरावर कितीक वर्षांपासून त्याची अवकळा पसरलीय. मंगलकार्याचा हेतूपण वाईटच असेल तर त्यातून मांगल्य तरी कसं दिसणार. माझा श्वास कोंडतो रे तिथे. वाटतं नेहमी एका अनामिक छायेखाली वावरतोय आपण. एका अभद्र सावटाची सत्ता आहे तिथे..... आणि आज आलेलं ते रानपाखरू.... तिला तर कल्पनाही नाही तिच्यासमोर काय वाढून ठेवलंय ते. तू चल पुढं, आलोच मी."

सुमती त्याची वाटच पाहत होती. विश्वनाथ खोलीत येताच ती धावतच त्याला बिलगली.

"विश्वा, कुठे होतास तू. हल्ली हल्ली तर माझ्यासमोर थांबतही नाहीस. असं झालंय तरी काय. काही सांगणारेस की नाही." तो काहीही बोलता तिथून निघून गेला.

वीणा भल्या पहाटेच उठून कामाला लागली. सडा-सारवण केलं. चहा ठेवला नि एकीकडे न्याहारी ची तयारी सुरु केली. अचानक समोरच्या चाळीत रडारड सुरु झाली. शंभू घाईघाईत वाड्यात शिरला.

"शंभूदादा, काय झालं? कसली गडबड आहे बाहेर?"

"वैनीबाय, समोरच्या चालीतल्या जानकी काकी वारल्या. सकालच्या पारी लवकर उठून न्हेमीची कामं उरकीत व्हत्या अचानक मोठ्यानं वरडत खालीच बसल्या. बसल्याजागीच खल्लास."


gudhgarbh , gudhkatha , vaarsaa , part 2 , https://gudhgarbh.blogspot.com/2020/09/blog-post_25.html , गूढगर्भ , गूढकथा , वारसा , भाग २


वीणा वाड्याबाहेर आली. एकवार चाळीकडे नजर टाकली आणि सहज तीच लक्ष गेलं. जानकी काकूंच्या खोलीच्या बरोब्बर समोर यदुनाथरावांची खिडकी होती. जानकी काकूंच्या दाराबाहेर गर्दी होती.

"हे उठले असतील का?" विचार करतच तिने यदुनाथरावांच्या खिडकीकडे पाहिलं. तिथे यदुनाथराव उभे होते. त्यांच्या डोळ्यातला विखार पाहून तिला धडकी भरली.

"विश्वा, होतास कुठे कालपासून?" गोदाक्काने जरबेने विचारलं.

"माळावरल्या खोपटात."

"तिथं काय काम असतं तुझं?"

"मग इथंतरी काय काम होतं?"

"घरी नवी सून आलीय आणि तुझा पत्ता काय?"

"या वाड्यातल्या सुना कुठं जातात त्यांचा पत्ता कुणाला असतो? मला तुमच्या कुठल्याच गोष्टीत काडीचाही रस नाही. वाड्यातही नाही आणि मालमत्तेतही नाही. तुम्ही माझ्या वाटेला गेलेलंच बरं." विश्वनाथ नाराजीने खोलीबाहेर पडला. घराबाहेर पाऊल टाकणार तोच मागून आवाज आला.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* वारसा - भाग १

अनाहूत

* दत्तकृपा 

2 comments: