रेश्मा

हे चित्र मी काढलं डिसेंबर २०१९ ला. त्याचं झालं असं की मी चित्रं काढायचे पण व्यक्तिचित्राबद्दल मनात न्यूनगंड होता. मला ते फार कठीण काम वाटायचं. मग माझ्या भाच्याने, बहिणीने काढलेली स्केचेस पाहिली आणि वाटलं हे दोघे लहान असून त्यांना जमतंय मग मी प्रयत्न करायला काय हरकत आहे? काही काळापूर्वी मी हेमा मालिनीच्या ‘धर्मात्मा’ मधल्या लूकचे काही फोटो ठेवले होते. त्यातला रेश्माचा म्हणजेच हेमा मालिनीचा लूक वेगळा आहे. म्हटलं सुरुवात तर करू. जमलं तर ठीक नाहीतर जाऊ दे.

चित्र काढायला घेतलं आणि आश्चर्य म्हणजे ते मूळ चित्राच्या थोडयाफार तरी जवळचं वाटत होतं. आठवडाभरात स्केच बनलं. प्रतिक्रिया तपासून पाहण्यासाठी एक दिवस मी ते व्हॉट्सअप च्या स्टेटस ला ठेवलं आणि माझ्या बहुतेक मैत्रिणींनी ते ओळखलं देखील. साध्या पेन्सिलने झेरॉक्स पेपरवर काढलेलं चित्र आहे हे. या एका चित्रामुळे अशक्य वाटणारी कामंही आपण लीलया करू शकतो असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला एवढं मात्र नक्की.



हेमा मालिनी - धर्मात्मा

(गूढगर्भ - रेखाटने)

No comments:

Post a Comment