वारसा - भाग ६

         "यदुनाथ वहिनींसमोर उभा होता. तो यदुनाथ नव्हताच. जर्जर म्हातारा. मोठे डोळे. नखं वाढलेली. मुखात तीक्ष्ण दात. पण अंगात कपडे मात्र यदुनाथाचे होते. एक एक करून तो त्याचे कपडे उतरवत होता. भीतीने गार झालेल्या वहिनीला ओरडायचंही भान नव्हतं. जणू दातखीळ बसलेली तिची. तो ओंगळ सैतान वहिनीशी लगट करू लागला. अंधारात नीटसं दिसत नव्हतं पण मधूनच चमकणाऱ्या विजेत त्याच रूप स्पष्ट दिसायचं. वहिनी दाराकडे धावली तसा तो विजेच्या चपळाईने तिला सामोरा आला. पुन्हा एकदा तिची अस्पष्ट किंकाळी ऐकू आली. लखकन वीज चमकली. मी पाहिलं. वहिनी मला पाठमोरी होती. विवस्त्र. तिला ते तसं पहावलं नाही. मी तोंड फिरवलं. थोड्या वेळाने आवाज बंद झाला. आत पाहिलं तर कपड्याच्या ढिगाशिवाय काहीच दिसेना. मी खाली उतरणार एवढ्यात आतून आवाज आला,

"थांब तिथंच. मला शोधतोयस ना? मग असा आडून कशाला बघतोस, समोर ये." खोलीतला सैतान कडाडला.

भीतीने माझे पाय थिजले होते.  मनात विचार चाललेले, "वहिनीसोबत काय घडलं असेल? कुठे गेली ती?"

"ती इथंच आहे. माझ्यासमोर."

"म्हणजे? याला माझे विचार वाचता येतात की काय?"

"हो, तुझे विचार कळतात मला." यदुनाथ आतून गडगडाटी हसला. "तुझेच काय, या वाड्यात हजर असलेल्या प्रत्येकाच्या मनात आत्ता काय चालू आहे हे मी इथं उभ्याउभ्या सांगू शकतो. मनात आणलं तर तुझे विचार तुझ्या इच्छेविरुद्ध माझ्या ताब्यात आणू शकतो."

"कोण आहेस तू? यदुनाथ नक्कीच नाही"

 पुन्हा एकदा तो गडगडाटी हसला.


gudhgarbh , gudhkatha , vaarsaa , part 6 , https://gudhgarbh.blogspot.com/2020/10/blog-post_7.html , गूढगर्भ , गूढकथा , वारसा , भाग ६

"मी? इथला मालक.... वाड्याचा वारस.... यदुनाथ केव्हाच मेला. मी कोण हे जाणून घेणं तुझ्या आकलनापलीकडलं आहे. इथं जन्माला येणाऱ्या नव्या रक्तात माझाच अंश असणार आहे. माझं अस्तित्व संपवायचा विचारही करू नकोस. तुझ्या हातात नाही ते. मनात आणलं तर तुला चिलटासारखं चिरडायला मला वेळ लागणार नाही. इथे जिवंत राहायचं असेल तर मुकाट आल्या पावली माघारी जा. जा.... चालता हो इथून. आणि हो, हे गुपित गुपितच राहायला हवं."    

मी खाली उतरलो आणि माडीवर गेलो. तिथेच झोपलो. पाऊस थांबला होता. मध्यरात्री कसल्याशा आवाजाने जाग आली. मी आवाजाच्या रोखाने गेलो. कोणीतरी काहीतरी ओढून नेत होतं. आवाज परसदारापाशी येऊन थांबला. मी बाहेर डोकावलं. यदुनाथ खड्डा खणत होता. बराच तरुण दिसत होता. दहा-बारा वर्षांपूर्वीचा यदुनाथ पाहत होतो मी. गोदाक्का माती बाजूला टाकीत होत्या. दोघेही भिजले होते. आणि अजून एक व्यक्ती तिथे होती.... पुष्पा वहिनी. विवस्त्र. ती ओळखताच येत नव्हती. शरीरातलं एकूणएक रक्त शोषून घेतल्यासारखं तिचं शरीर झालं होत. डोळे खोबणीत भेसूर दिसत होते. नुसती कातडी शिल्लक होती हाडाला चिकटलेली. अंगावर ठिकठिकाणी ओरखडे होते. कमरेखालचा भाग जखम झाल्यासारखा रक्ताळलेला होता. डोक्यावर विजेचा लोळ कोसळल्यासारखी माझी अवस्था झाली. तंद्रीतच मी वर माडीवर गेलो. तेव्हापासून माझं मन वाड्यात रमेनासं झालं. दुसऱ्या दिवशी तीच आवई उठवली गेली. पुष्पा वहिनी बेपत्ता झाल्याची. यदुनाथ माणसाच्या रूपात सैतान आहे. दादांचा वारसा त्याला लाभलाय."

"मग हे कोणी थांबवू शकत नाही का?"

"मी प्रयत्न केला नसेल असं वाटलं तुला? पण तो सैतान शक्तीशाली आहे. आपल्या मनातले विचारही त्याच्या कक्षेत आल्यावर आपले राहत नाहीत. समोरच्या चाळीतल्या जानकीकाकू कशानं गेल्या? जर यदुनाथ आणि वीणावहिनींमधेही तेच झालं तर अजून काही वर्ष ठीक जातील अन्यथा तो वारसा आपल्या बाळाकडे येईल. माहितेय ना, वाड्याला पुत्रसंतानच लाभेल असा आशीर्वाद आहे मांत्रिकाचा आणि मला ते नकोय. म्हणूनच मी तुझ्यापासून दूर राहतो. याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही. तू जिवंत रहावीस म्हणूनच हे सहन करतोय. मला माफ कर."

सुमतीचे डोळे डबडबले. दोघंही एकमेकांच्या मिठीत बराच वेळ रडत होते. पण याचा अंत कुठेतरी व्हायला हवा होता.

"मग दादांचं काय झालं?" सुमतीनं डोळे पुसत विचारलं.

"म्या सांगतो." दारात शंभुनाथ उभा होता. सुमती आणि विश्वनाथला आश्चर्याचा सौम्य धक्का बसला.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* वारसा - भाग ५

* अनाहूत

* दत्तकृपा 

No comments:

Post a Comment