अ मिडसमर ड्रीम - भाग ४

 

आता खोलीतला उजेड प्रखर झाला. सर्वजण लपलेल्या जागेतून बाहेर आले आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांना पुस्तकाची आठवण झाली. गडबडीत त्यांनी ते पुस्तक डायनिंग टेबलवरच ठेवले होते. त्यांनी पुढील नियम वाचला….."चूझ राईट ऑप्शन बिकॉज यू डोन्ट हॅव अदर."

"मिन्स....?" स्टेला गोंधळली.

पुन्हा सर्वजण तर्कवितर्क लावत खोलीबाहेर पडले. कसलीतरी आठवण झाल्यासारखी केट पुन्हा मागे वळली.

"कुठे चाललीस?" जेम्सने विचारले.

"त्या पाहुण्याला श्रद्धांजली वाहायला...."

"व्हॉट?" सर्वांच्याच तोंडाचा आ वासला. उत्सुकतेपोटी सर्वजण तिच्या मागोमाग गेले. तिने ती लपलेल्या कपाटातून काही हत्यारं घेतली. आणि बाकिच्यांनाही त्यातून हत्यारं घेण्याची खूण केली.

"यू सिली डिक. मघाशी मी तुला एवढं सांगत होती की इथून काहीतरी उचलून मार त्याला तेव्हा बावळट ध्यान होऊन बसलेलास." केट फ्रॅंकवर डाफरली.

"एक्सक्यूस मी.... मी लपलेलो त्या जागी हत्यारं नव्हती ओके."


gudhgarbh , goodhgarbh , a midsummer dream , part 4 , गूढगर्भ , गूढकथा , अ मिडसमर ड्रीम , भाग ४ , https://gudhgarbh.blogspot.com/2021/01/blog-post_6.html


"म्हणूनच तर म्हटलं तुला बावळट.... काहीतरी वस्तू घेऊन निदान त्याचं लक्ष विचलित केलं असतं तर...."

"....आणि काय, त्याने स्टेलाला सोडून माझंच एन्काउंटर केलं असतं."

"ओह शटप फ्रॅंक. स्टॉप धिस नॉन्सेन्स अँड लेट्स कम आऊट ऑफ धिस. पुढला नियम वाचा." स्टेला या थरारक जत्रेतून लवकर बाहेर पडण्याची वाट बघत होती. त्यांना पुस्तकाची आठवण झाली. गडबडीत त्यांनी ते पुस्तक डायनिंग टेबलवरच ठेवले होते. ते घेऊन पुन्हा सर्वजण तर्कवितर्क लावत खोलीबाहेर पडले. सर्वजण घाबरून दबकत चालत होते. चालत चालत ते एका स्केटबोर्ड गेमपाशी आले. फ्रॅंकने आजूबाजूला नजर फिरवत नियम वाचला.... "इझी टू सी हार्ड टू विन."

तिथे एका वाळूच्या रिंगणात लांबचलांब 'यू' आकाराच्या गुळगुळीत पृष्ठभागावर दिलेल्या वेळेत स्केटबोर्डने करामती करून दाखवायच्या होत्या. जेम्स यात तरबेज होता. तो व्यायामपटू होता. आणि तशा स्पर्धाही जिंकला होता. तो रिंगणात उतरला. यू शेपच्या बाहेरच्या जमिनीवर गोलाकार भागात वाळू पसरली होती.

त्याने स्केटवर पाय ठेवला व रेडी झाला. सर्वजण त्याला चिअर करू लागले. जवळपास पाचेक मिनिटे तो त्या यू शेपवर करामती करत होता. एकाएकी त्याचा स्केटबोर्डवरचा तोल गेला आणि तो घसरला. त्याच्या गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाली. तो तिथल्यातिथे गुढघा पकडून बसला. स्केटबोर्ड सोडून तो बाहेर येणार होता पण अजून खेळाची वेळ पूर्ण झाली नव्हती. तो खेळ मधूनच सोडून चालला होता. जे नियमबाह्य होतं. अचानक त्या वाळूत हालचाल झाली आणि एक मानवी हात बाहेर आला. तो हात नॉर्मल वाटत नव्हता. ही जत्रेतली ट्रिकदेखील नव्हती. एखाद्या प्राण्याने खाल्ल्यावर उरलेल्या अवशेषांसारखा तो दिसत होता. त्या हाताने जेम्सचा दुखरा पाय पकडला. त्यावरचं मांस झडून गेलेलं, ठिकठिकाणी वाळू लागलेली तरीही तो हात सर्व शक्तीनिशी जेम्सला वाळूत खेचत होता. फ्रॅंक रिंगणाबाहेरूनच वाळूतल्या हातावर वार करू पाहत होता. स्टेला थोडं अंतर राखून दुरूनच त्या हाताला जखमी करू पाहत होती. त्या नादात तिच्या हातातली तलवार वाळूत पडली. एकाएकी त्या वाळूतून दुसरा हात बाहेर आला आणि त्याने फ्रॅन्कची मान पकडली. जवळच उभ्या असलेल्या स्टेलाने प्रसंगावधान राखून त्याला वेळीच मागे खेचले आणि तो त्या विळख्यातून सुखरूप बचावला. फ्रॅंक आणि स्टेला दोघांची एकमेव हत्यारं वाळूत गडप झाली होती. तिघेही त्याला वाचवायचा प्रयत्न करत होते पण तोपर्यंत तो अर्धाअधिक वाळूत खचला होता. बघता बघता तो त्यात गडप झाला.



(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* रघ्याची बायको

* रिटर्न गिफ्ट 

No comments:

Post a Comment