ही चाल तुरुतुरु


ही चाल तुडतुडी

तुडवी वाट नागमोडी

डाव्या डोळ्यानं ही तिरळी

जशी काटेरीच्या वनात

बाभळीच्या पानात

चुचुंद्री चुकचुकली ll१ll

 

इथं कुणी आसपास ना

वासून थोबाड हास ना

गप जरा ऱ्हा की अबोल ना

ओठांचा चंबू ना खोलना

ही तुडतुडत जाता

चकण्या नजरेनं पहाता

घूस बिळामध्ये गडबडली ll२ll

 

केसाच्या झिपऱ्या सारून

फुकाचा नखरा आणून

शेपूट चाचपून हातानं

पाव शिळा दाबूनशी दातानं

हा ढासा जीवघेणा

तसा मी आहे शहाणा

आता तुझी मला खूण पटली ll३ll








(गूढगर्भ - कवितासंग्रह)


मेरे रशके कमर 

No comments:

Post a Comment